Marquee Stop on Hover
Cashless Facilities Available, Mediclaim Reimbursement Available, Video Rectoscopy Available, Laser Treatment Available . Branches - Pune , Mumbai.

अर्श म्हणजेच मुळव्याध – बदलत्या जीवनशैलीचा परिणाम .— डॉ. कुणाल कामठे

गेल्या दशकापासून सर्वांची जीवनशैली बदलली आहे . खाण्यापिण्याच्या सवयी , व्यायाम न करणे , रात्रीच्या पार्टी जास्त करणे , भेसळयुक्त खाणे इ. मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
मुळव्याध ही एक गंभीर समस्या आहे. मुळव्याध म्हणजे शौचास होताना वेदना होणे ,खाज येणे ,रक्तस्त्राव होणे, आग होणे ,सूज येणे, कधी कधी चिकट स्राव येणे इ. या पैकी वेगवेगळी लक्षणे प्रत्येकात दिसतात .मुळव्याध म्हणजेच पाइल्स, जे गुदद्वार आणि मलाशयातील सूज आणि तणावाने निर्माण होतात.मुळव्याध असलेल्या लोकांनी आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला हवी, अन्यथा ते बरे होण्याऐवजी अजून गंभीर रूप धारण करू शकतात . मुळव्याध असणाऱ्यांनी आहाराबाबत काय काळजी घ्यावी जाणून घेऊयात. मुळव्याध असलेल्यांनी हे खाणं टाळावं – हिरवी मिरची खाण्याचा मोह टाळायला हवा. अनेकांना तिखट मिरची आणि चटपटीत मसालेदार खाणे आवडते पण त्याने त्यांची समस्या अधिक वाढू शकते. म्हणून आपल्या आरोग्यासाठी त्यांनी मिरची आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये. कुठल्याही प्रकारचं व्यसन मुळव्याध असणाऱ्या रुग्णांसाठी घातक आहे. सुपारी, पान मसाला, गुटखा,मद्यपान यांचे सेवन करू नये. अनेकदा आपण पाहतो की अनेक लोकांना मिसरी / तंबाखू असे पदार्थ खाल्ल्याशिवाय शौचास होत नाही.परंतु हा त्यांचा गैरसमज असतो .उलट यामुळे हे आजार जीर्ण होत जातात . पाकिटातील अन्न हे चटकदार असते पण ते आरोग्यासाठी तेवढेच हानिकारक सते. त्यात पोषक द्रव्यांपेक्षा जास्त हानिकारक केमिकल असतात जे स्थूलता निर्माण करतात. म्हणून मुळव्याध असलेल्यांनी ते खाऊ नये. मुळव्याध असणाऱ्यांनी बाहेर खाणे टाळावे, हॉटेलमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ अति तेलात आणि मसाल्यात बनवले जातात, त्याने पचन योग्य होत नाही. सोबतच त्यांनी मांसाहार पण करू नये, कारण मांसाहारात तेल आणि मसाले अति प्रमाणात असतात, ज्याने त्यांना त्रास होऊ शकतो.
जागरण – अति जागरण केल्याने हा त्रास वाढू शकतो . शरीरातील उष्णता वाढून मुळव्याध वाढू शकतो . त्यामुळे हे टाळावे.
अशा प्रकारे आहार व विहार जेवढा चुकीचा तेवढा मुळव्याध जवळचा असं म्हणावे लागेल.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

MR
Scroll to Top